गोविंद तळवलकर : एका पर्वाचा अंत
ऐंशीच्या दशकात गोविंद तळवलकर यांना ‘हस्तिदंती मनोऱ्यातील संपादक’ म्हणून आणि माधव गडकरी यांच्याकडे ‘चळवळीतील लोकाभिमुख संपादक’ म्हणून पाहिले जात असे. परंतु कोणी काही म्हणो, या दोन्ही संपादकांचे योगदान मराठी पत्रकारितेत मोलाचे आहे. कर्णिकांनंतर 'महाराष्ट्र टाइम्स' ला परिपूर्ण व दर्जेदार वृत्तपत्र म्हणून ओळख देण्यासाठी तळवलकर यांनी सर्वार्थाने प्रयत्न केले........